सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

सरळसेवा भरती करिता सुधारित बिंदू नामावली

महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१९ (सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ७) दि. ३ जुलै, २०१९ राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १३% (तेरा टक्के) इतक्या जागा ह्या, मराठा समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी निश्चित केल्या आहेत. त्याअनुषंगाने संदर्भाधिन क्र.८ येथील दि.४.७.२०१९ च्या निर्णयान्वये एसईबीसी वर्गाच्या १३ टक्के आरक्षणासह सरळसेवा भरतीकरीता सुधारित बिंदूनामावली विहित करण्यात आली होती.

Leave a Comment