सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

नैमित्तिक रजा व अर्जित रजा शासन निर्णय

नैमित्तिक रजा व अर्जित रजा

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१नैमित्तिक रजा पुरेशा कारणाशिवाय मागितली असल्यास नाकारणे – पूर्वानुमती शिवाय घेतल्यास अवैतनिक रजा मानणे, बदली रजा देय रजेच्या पूर्वी सुट्ट्यांच्या पूर्वी घेता येईल.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२४/३/१९८२
०२नैमित्तिक रजा (नैमित्तिक रजा एका वेळी ७ दिवसांपेक्षा अधिक घेता येणार नाही )शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/१२/१९९८
०३अर्जित व अर्धवेतनी रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा – प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ दिवस व १० दिवस जमा होईल. (नियम ५० ) व (नियम ६० पुस्तकात अंतर्भूत आहे.)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग९/११/१९९०
०४अर्जित रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा – प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ व १० दिवस जमा होईल , कॅलेंडर वर्षाच्या मध्येच रुजू झाल्यास /राजीनामा /सेवानिवृत्त /सेवेतून काढून टाकणे /बडतर्फ निलंबन /मृत्यू याकरिता प्रत्येक पूर्ण महिन्याकरिता २.५ दिवस रजा (नियम ५१व६० ) म.ना.से. रजा नियम १९८१ च्या शेवटी दुरुस्ती चिट्टी आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग९/११/१९९०
०५शासन सेवेत तदर्थ / अस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा – २.५ अर्जित रजा, रजा रोखीकारणाचा लाभ नाही , सलग ३ वर्षे असल्यास नियम अस्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचा लाभ मिळेल.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/३/१९९७
०६अर्जित रजेचे प्रत्यार्पण (रजा विकणे )सदर सवलत दि.१/२/२००१ पासून बंद केली आहे.(नियम ७३) याबाबतची अधिसूचना दि.५/२/२००१शालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/१/२००१
०७अर्जित रजा साठविण्याची मर्यादा २४० ऐवजी ३०० दिवस केलीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/१/२००१
०८उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित – अर्जित रजेची मर्यादा २४० ऐवजी ३०० केलीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग५/२/२००१
०९विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर वर्षाच्या सुरुवातीस अर्जित रजा जमा करण्याबाबत – नियम ३ अ ) क्षयरोग /कर्करोग /पक्षघात झालेल्या कर्मचाऱ्यास १ वर्षाच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वेतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या खाती जमा करावयाच्या अर्जित रजा विशेष रजेच्या कालावधीच्या १/१० परंतु कमाल १५ दिवसांपर्यंत कमी करता येईल.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग६/१२/२००५

Leave a Comment