नैमित्तिक रजा व अर्जित रजा
अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
०१ | नैमित्तिक रजा पुरेशा कारणाशिवाय मागितली असल्यास नाकारणे – पूर्वानुमती शिवाय घेतल्यास अवैतनिक रजा मानणे, बदली रजा देय रजेच्या पूर्वी सुट्ट्यांच्या पूर्वी घेता येईल. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २४/३/१९८२ |
०२ | नैमित्तिक रजा (नैमित्तिक रजा एका वेळी ७ दिवसांपेक्षा अधिक घेता येणार नाही ) | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/१२/१९९८ |
०३ | अर्जित व अर्धवेतनी रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा – प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ दिवस व १० दिवस जमा होईल. (नियम ५० ) व (नियम ६० पुस्तकात अंतर्भूत आहे.) | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ९/११/१९९० |
०४ | अर्जित रजा परिगणना करण्याच्या पद्धतीत सुधारणा – प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै मध्ये अर्जित रजा व अर्धवेतानी रजा अनुक्रमे १५ व १० दिवस जमा होईल , कॅलेंडर वर्षाच्या मध्येच रुजू झाल्यास /राजीनामा /सेवानिवृत्त /सेवेतून काढून टाकणे /बडतर्फ निलंबन /मृत्यू याकरिता प्रत्येक पूर्ण महिन्याकरिता २.५ दिवस रजा (नियम ५१व६० ) म.ना.से. रजा नियम १९८१ च्या शेवटी दुरुस्ती चिट्टी आहे. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ९/११/१९९० |
०५ | शासन सेवेत तदर्थ / अस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजा – २.५ अर्जित रजा, रजा रोखीकारणाचा लाभ नाही , सलग ३ वर्षे असल्यास नियम अस्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेचा लाभ मिळेल. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १/३/१९९७ |
०६ | अर्जित रजेचे प्रत्यार्पण (रजा विकणे )सदर सवलत दि.१/२/२००१ पासून बंद केली आहे.(नियम ७३) याबाबतची अधिसूचना दि.५/२/२००१ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १५/१/२००१ |
०७ | अर्जित रजा साठविण्याची मर्यादा २४० ऐवजी ३०० दिवस केली | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १५/१/२००१ |
०८ | उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित – अर्जित रजेची मर्यादा २४० ऐवजी ३०० केली | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ५/२/२००१ |
०९ | विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर वर्षाच्या सुरुवातीस अर्जित रजा जमा करण्याबाबत – नियम ३ अ ) क्षयरोग /कर्करोग /पक्षघात झालेल्या कर्मचाऱ्यास १ वर्षाच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वेतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या खाती जमा करावयाच्या अर्जित रजा विशेष रजेच्या कालावधीच्या १/१० परंतु कमाल १५ दिवसांपर्यंत कमी करता येईल. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ६/१२/२००५ |